Kapus Soybean Farmers Beneficiary Status: आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि इतर कारणांमुळे बाजारात झालेल्या किंमतीतील घसरणीमुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम २०२३-२४ अंतर्गत दोन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी ५,००० रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण प्रणाली (DBT)द्वारे जमा करण्यात येत आहे.
अर्थसहाय्याचे स्टेट्स ऑनलाईन तपासण्याची प्रक्रिया | Kapus Soybean Farmers Beneficiary Status
कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे की नाही, हे ऑनलाईन तपासण्यासाठी खालील प्रक्रिया करा:
- सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट https://scagridbt.mahait.org/ लिंकवर क्लिक करा.
- वेबसाईट उघडल्यानंतर, “Disbursement Status” या पर्यायावर क्लिक करा.
- पुढे आलेल्या पेजवर आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाका आणि “Get Aadhaar OTP” या बटनावर क्लिक करा.
- OTP प्राप्त झाल्यानंतर त्याचा वापर करून लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याचे सविस्तर स्टेट्स पाहायला मिळेल. Kapus Soybean Farmers Beneficiary Status
कृषी विभागाचा शासन निर्णय
सन २०२३ च्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय मा. मंत्रिमंडळाने दि. ११ जुलै २०२४ रोजी घेतला आहे. ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १,००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु. ५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) असे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
हा निर्णय शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी किंवा शासन निर्णय पाहण्यासाठी, इथे क्लिक करा.
शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपल्या अनुदानाची स्थिती तपासून घ्यावी.
2 thoughts on “Kapus Soybean Farmers Beneficiary Status: कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्थसहाय्य मिळाल्याची स्थिती कशी तपासावी”