Crop Insurance : ३७१ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; ७३ हजार शेतकरी लाभापासून वंचित

Crop Insurance: २०२३ च्या खरीप हंगामात पीकविमा उतरवलेल्या छत्रपती सांभाजीनगर जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार २०३ शेतकऱ्यांपैकी, नुकसानग्रस्त ३ लाख ६४ हजार ७९९ शेतकऱ्यांच्या (८३.२४ टक्के) बँक खात्यात तीन टप्प्यांत एकूण ३७० कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance

गत खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे पीकविमा उतरवलेल्या जिल्ह्यातील ३ लाख २८ हजार ३०४ शेतकऱ्यांना विमा कंपनीने २५ टक्के अग्रिम म्हणून ३३०.७७ कोटी रुपये दिले होते. मात्र, काही शेतकऱ्यांची पीक पडताळणी प्रक्रिया अपूर्ण असल्याने त्यांना ही रक्कम मिळालेली नव्हती. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनांच्या परिणामी मे आणि जून महिन्यांत दुसऱ्या टप्प्यांत तक्रारदार शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारींच्या आधारावर नुकसानभरपाई दिली गेली. तसेच, अंतिम टप्प्यात, पीक कापणी प्रयोग आणि उत्पन्नावर आधारित निकषांचा वापर करून, ३६ हजार ४९५ शेतकऱ्यांच्या खात्यावर ४०.०९ कोटी रुपयांची अंतिम रक्कम जमा करण्यात आली.

हे वाचलंय का? E-Peek Pahani 2024 : ई पीक पाहणी सुरू! ऑनलाईन पीक नोंदणी कशी करावी?

छत्रपती सांभाजीनगर जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी एकूण ४ लाख ३८ हजार २०३ शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. यातील ८३.२४ टक्के म्हणजेच ३ लाख ६४ हजार ७९९ शेतकऱ्यांना ३७०.८५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. मात्र, ७३ हजार ४०४ शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

सोयगाव आणि वैजापूर तालुके आघाडीवर

गत हंगामात, वैजापूर तालुक्यातील ८२ हजार ११५ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला होता. यापैकी ९८.८४ टक्के म्हणजेच ८१ हजार १६४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीकविमा भरपाई म्हणून १०५.४५७ कोटी रुपये जमा झाले आहेत. सोयगाव तालुक्यातील २० हजार ८५७ शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. यापैकी २० हजार ७८७ म्हणजेच ९९.६६ टक्के शेतकऱ्यांना ३१.१४ कोटी रुपये मिळाले आहेत.

Crop Insurance: जिल्ह्याची पीकविमा आकडेवारी

तालुकाविमा काढलेलेविमा प्राप्त शेतकरीटक्केवारीप्राप्त विमा रक्कम
छ. संभाजीनगर३४१६७२६५७८७७.७८%२४.५३ कोटी रु.
गंगापूर६०७८३५३८७८८८.६३%५७.८६ कोटी
कन्नड६७१९६५८२०४८६.६१%५१.७१ कोटी
खुलताबाद२०४४११३८७७६७.८८%१०.१० कोटी
पैठण५४६०६३५७४३६५.४५%२६.४४ कोटी
फुलंब्री३६३६७१९२६३५२.९६%१४.८८ कोटी
सिल्लोड६१६७१५५३०५८९.६७%४८.७३ कोटी
सोयगाव२०८५७२०७८७९९.६७%३१.१४ कोटी
वैजापूर८२११५८११६४९८.८४%१०५.४५ कोटी
एकूण४३८२०३३६४७९९८३.२४%३७०.८५ कोटी
Crop Insurance list

फुलंब्री तालुक्याला सर्वांत कमी लाभ

छत्रपती सांभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचा सर्वात कमी लाभ मिळाला आहे. तालुक्यातील पीकविमा उतरवलेल्या ३६ हजार ३६७ शेतकऱ्यांपैकी केवळ ५२.९६ टक्के शेतकऱ्यांनाच पीकविमा नुकसानभरपाई मिळाली आहे.