Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचं टेन्शन मिटलं! सर्वांत मोठी अडचण दूर; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: राज्य सरकारने महिलांना येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता लाखो महिलांना फायदा होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत देणे आहे. आतापर्यंत साधारणपणे दोन कोटींपेक्षा अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत आणि एक कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिक मदत मिळाली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी महिलांना 3000 रुपये देण्यात आले आहेत.

महिलांना नेमकी काय अडचण येत होती?

या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3000 रुपये टाकले आहेत. परंतु, अनेक महिलांच्या बँक खात्यावर जमा झालेली रक्कम बँकांनी विविध कारणांमुळे कापून घेतली आहे. काही बँकांनी मिनिमम बॅलन्स न ठेवल्यामुळे आणि अन्य दंडात्मक शुल्कांच्या नावाखाली महिलांच्या खात्यातून पैसे वळते केले आहेत. त्यामुळे अनेक महिलांना त्यांची संपूर्ण रक्कम मिळाली नाही.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

राज्य सरकारने घेतली दखल | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

महिलांच्या या अडचणीची राज्य सरकारने तात्काळ दखल घेतली आहे. महिला आणि बालविकास विभागाने बँकांना सूचित केले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये. लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही, या योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत. तसेच, लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असल्यास ते पूर्ववत करावे, असेही निर्देश बँकांना दिले आहेत.

योजनेचा फायदा सर्व महिलांना

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना संपूर्ण रक्कम मिळणार आहे. कोणत्याही बँकेकडून कोणतेही शुल्क कापले जाणार नाही, त्यामुळे लाभार्थी महिलांना आता आर्थिक दिलासा मिळणार आहे.

अशा प्रकारे राज्य सरकारने महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी उचललेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.

Battery Operated Sprayer Pump: बॅटरी संचलित फवारणी पंपसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ 

2 thoughts on “Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचं टेन्शन मिटलं! सर्वांत मोठी अडचण दूर; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!”

Leave a Comment