Ladki Bahin Yojana: राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये जमा झालेले आहेत, ज्यामुळे रक्षाबंधनाच्या सणाच्या मुहूर्तावर महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. यानंतर, आता सप्टेंबर महिन्यात तिसरा हफ्ता म्हणून महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेत सरकारकडून महिलांच्या खात्यात निधी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत, ज्यामुळे या महिलांना रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाली आहे. ज्या महिलांनी 1 ते 31 जुलै दरम्यान अर्ज केले आहेत, त्यांच्याच खात्यात पैसे जमा झाले आहेत. पण ज्या महिलांनी ऑगस्टनंतर अर्ज केले आहेत, त्यांचे पैसे कधी मिळणार? हे जाणून घेऊया.
Crop Insurance : ३७१ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; ७३ हजार शेतकरी लाभापासून वंचित
ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केले आहेत, त्यांच्या अर्जाची छाननी करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. आता या महिलांच्या अर्जावर सरकारकडून उत्तर येणार आहे, ज्यामध्ये अर्ज मंजूर झाले आहेत की नाही, याची माहिती दिली जाणार आहे. अर्जामध्ये कोणत्याही दुरुस्तीच्या सूचना दिल्या जाणार आहेत किंवा अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता आहे. अर्जावर उत्तर आल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरु होणार आहे.
Ladki Bahin Yojana: 4500 रुपये कसे जमा होणार?
ज्या महिलांचे अर्ज अद्याप मंजूर झाले नाहीत, त्यांना जुलै आणि ऑगस्टचा लाभ मिळणार नाही. परंतु, सप्टेंबरपूर्वी अर्ज मंजूर झाला, तर त्या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांना तीन महिन्यांचा हप्ता एकाच वेळी मिळणार आहे, ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.