Maharashtra Police Recruitment: तरुण-तरुणींसाठी खुशखबर, राज्यात डिसेंबरमध्ये साडेसात हजार पदांसाठी पुन्हा पोलीस भरती

Maharashtra Police Recruitment: पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. राज्यात डिसेंबर महिन्यात साडेसात हजार पोलीस पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे, यापैकी तब्बल 1200 पदे मुंबई पोलीस दलासाठी भरली जाणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मागील दोन वर्षांत जवळपास 35 हजार पोलीस पदांवर भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. परंतु, पोलिसांची संख्या अद्याप अपुरी असल्याने, डिसेंबर महिन्यात आणखी 7500 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. 2022 आणि 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती, त्यानंतर आता पुन्हा एकदा ही प्रक्रिया सुरू होणार आहे. Maharashtra Police Recruitment

Cotton Rate: यंदा तरी कापसाचे भाव वाढतील का? समोर आली मोठी माहिती

कोरोना काळात रखडलेली भरती प्रक्रिया

कोरोना महामारीमुळे जगभरात सर्वकाही ठप्प झाले होते, आणि त्यामुळे तीन वर्षांपासून राज्यात पोलीस भरती प्रक्रिया रखडली होती. वाढत्या लोकसंख्येमुळे पोलीस दलातील संख्याबळ कमी पडत होते. त्यामुळे, मागील दोन वर्षांत अनुक्रमे 18 हजार आणि 17 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली. तथापि, अजूनही सात ते आठ हजार पोलीस पदांची गरज असल्यामुळे, डिसेंबरमध्ये 7500 पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Police Recruitment

काही दिवसांपूर्वी राज्यात राबवण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेअंतर्गत 14,471 पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसामुळे मुंबई पोलिसांना मैदान उपलब्ध न झाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशीरानं घेण्यात आली होती. सध्याची भरती प्रक्रिया संपल्यानंतर राज्यात नवी भरती प्रक्रिया सुरू होईल.

मुंबई पोलीस दलासाठी 1200 पदांसाठी भरती

डिसेंबरमध्ये राबवण्यात येणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेत, मुंबई पोलीस दलासाठी 1200 पदांसाठी भरती होणार आहे. गेल्या वर्षी मुंबईत 8000 पोलीस पदांची भरती करण्यात आली होती, ज्यातील बहुतांश पोलीस सप्टेंबरमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत दाखल होतील. सध्या मुंबईत 4230 पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरू आहे, आणि त्यासाठी 5.69 लाख अर्ज आले आहेत. Maharashtra Police Recruitment

महिला पोलीस भरतीसाठी पावणेतीन लाख अर्ज

महिला पोलीस भरतीसाठी यावेळी 3924 पदांसाठी पावणेतीन लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. यातील एक लाखाहून अधिक महिला उमेदवार उच्चशिक्षित आहेत. मुंबई पोलीस दलातील भरतीसाठी सर्वाधिक अर्ज आले असून, एक लाखाहून अधिक महिलांनी मुंबईत भरतीसाठी अर्ज केले आहेत.

Crop Insurance Latest Updates : मागील खरिपातील पीकविमा रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळेना, ३ हजार कोटींची प्रलंबित रक्कम

Leave a Comment