Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वस्त आणि शाश्वत ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना (Magel Tyala Saur Krushi Pump Yojana – MTSKPY) सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारे कृषी पंप दिले जातात, ज्यामुळे विजेची बचत होऊन सिंचनाची समस्या दूर होते.
योजनेची वैशिष्ट्ये: Magel Tyala Saur Krushi Pump Yojana
- शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वतंत्र आणि शाश्वत ऊर्जेचा स्रोत मिळणार.
- सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी पंपाच्या किंमतीच्या केवळ १० टक्के रक्कम भरावी लागेल, उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र सरकारकडून अनुदानाद्वारे दिली जाईल.
- अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांना फक्त ५ टक्के रक्कम भरावी लागेल.
- ३ ते ७.५ अश्वशक्ती (HP) चे सौर कृषी पंप उपलब्ध आहेत.
- पंपांसाठी ५ वर्षांची दुरुस्ती हमी व विमा संरक्षण.
- वीजबिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही.
- दिवसा सिंचनासाठी अखंडित वीजपुरवठा.
लाभार्थी निवडीचे निकष:
- २.५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यांसाठी ३ HP पंप, २.५१ ते ५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यांसाठी ५ HP पंप, आणि ५ एकराहून जास्त शेतजमीन धारकांसाठी ७.५ HP पंप देण्यात येईल.
- शेततळे, विहीर, बोअरवेल किंवा बारमाही वाहणारे नदी/नाले यांच्याजवळील शेतजमीनधारक देखील या योजनेसाठी पात्र आहेत.
- शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याचा स्रोत असावा, याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल.
अर्ज कसा करायचा?
- महावितरणच्या अधिकृत वेब पोर्टलवर https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php भेट द्या.
- A-1 अर्ज ऑनलाइन भरा. अर्ज भरण्याची प्रक्रिया सोपी आहे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत खालील कागदपत्रे अपलोड करावीत:
- 7/12 उतारा (जलस्त्रोताची नोंद आवश्यक आहे)
- आधारकार्ड
- जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/जमाती लाभार्थ्यांसाठी)
- इतर हिस्सेदारांचा ना हरकत दाखला (शेतजमिनीचा एकटा मालक नसल्यास)
- पाण्याचा स्त्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र.
किती रक्कम भरावी लागेल? (Magel Tyala Saur Krushi Pump Yojana – MTSKPY)
- सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी पंपाच्या किंमतीच्या १० टक्के रक्कम भरावी लागेल.
- अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांसाठी ५ टक्के रक्कम भरावी लागेल.
आम्हच्या गावी हा प्रकल्प करायचा आहे माहिती द्या