Lek Ladki Yojana: लाडक्या बहिणींना दीड हजार, तर लाडक्या लेकीला 1 लाख 1 हजार, लेक लाडकी योजना काय आहे?

Lek Ladki Yojana:’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ची सध्या खूप चर्चा आहे, परंतु राज्य सरकारने राबविलेल्या ‘लेक लाडकी योजना’ (Lek Ladki Yojana) विषयी अनेकांना माहिती नाही. या योजनेद्वारे मुलींना एक लाख एक हजार रुपये आर्थिक मदत मिळते. चला, या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lek Ladki Yojana: लेक लाडकी योजना म्हणजे काय?

राज्य सरकारने 1 एप्रिल 2023 पासून ‘माझी कन्या भाग्यश्री (सुधारित)’ ही योजना अधिक्रमित करून ‘लेक लाडकी योजना’ (Lek Ladki Yojana in marathi ) सुरू केली. योजनेचे उद्दिष्ट मुलींच्या सक्षमीकरणासाठी आहे. मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देणे, मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, बालविवाह रोखणे, आणि कुपोषण कमी करणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत.

या योजनेद्वारे मुलींना काय लाभ मिळतात? (Lek Ladki Yojana Benifits)

पिवळे आणि केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलींना या योजनेद्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते. लाभाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

  • मुलीच्या जन्मानंतर: 5,000 रुपये
  • इयत्ता पहिलीत: 6,000 रुपये
  • सहावीत: 7,000 रुपये
  • अकरावीत: 8,000 रुपये
  • मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर: 75,000 रुपये

एकूण लाभ: 1,01,000 रुपये

योजनेच्या अटी आणि शर्ती

  1. पात्रता: योजना फक्त पिवळे आणि केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलींना लागू आहे.
  2. मुलींचा जन्म: 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींना योजना लागू होईल.
  3. कुटुंब नियोजन प्रमाणपत्र: पहिल्या आणि दुसऱ्या अपत्याच्या लाभासाठी अर्ज करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  4. मुलींच्या जन्मानंतरच्या लाभासाठी: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  5. निवासी अट: लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  6. बँक खाते: लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.

लाभासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. लाभार्थीचा जन्मदाखला
  2. कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला (उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे)
  3. लाभार्थीचे आधार कार्ड
  4. पालकांचे आधार कार्ड
  5. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
  6. रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी)
  7. मतदान ओळखपत्र
  8. शाळेचा दाखला (संबंधित टप्प्यावरील लाभासाठी)
  9. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
  10. अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक

निष्कर्ष

‘लेक लाडकी योजना’ मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक महत्वाची योजना आहे जी मुलींच्या जन्मापासून त्यांच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करते. या योजनेद्वारे राज्यातील मुलींचा विकास आणि सक्षमीकरण होईल, असे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे.

हे हि वाचा

Mahavitaran Abhay Yojana: वीज ग्राहकांसाठी नवा दिलासा, महावितरणच्या नवीन अभय योजनेतून ३८ लाख ग्राहकांना दिलासा

Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा मिळवाल? जाणून घ्या सविस्तर माहिती

Leave a Comment