Kapus Soybean Anudan : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने प्रतिहेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्याची घोषणा केली आहे. हे अनुदान २०२३-२४ च्या खरीप हंगामासाठी लागू आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आणि आपल्या खात्यात अनुदान जमा झाले आहे का, हे तपासण्यासाठी खालील प्रक्रिया पाळा. Kapus Soybean Anudan
कापूस व सोयाबीन अनुदान तपासण्याची प्रक्रिया
१. वेबसाईटला भेट द्या: सर्वप्रथम, https://scagridbt.mahait.org या अधिकृत अनुदान वितरण पोर्टलला भेट द्या.
२. Disbursement Status वर क्लिक करा: वेबसाईट उघडल्यानंतर, उजव्या बाजूला वरती लाल रंगाच्या चौकोनात “Disbursement Status” या पर्यायावर क्लिक करा.
३. आधार क्रमांक व कॅप्चा टाका: उघडलेल्या पेजवर आपल्या आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका. नंतर “Get Aadhaar OTP” या बटणावर क्लिक करा.
४. ओटीपीद्वारे माहिती मिळवा: आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाका आणि सबमिट करा. यानंतर कापूस व सोयाबीन अनुदानाच्या वितरणाची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल.
Kapus Soybean Anudan : महत्त्वाची माहिती
- अनुदानाची रक्कम: किमान १ हजार रुपये ते जास्तीत जास्त १० हजार रुपये (दोन हेक्टरच्या मर्यादेत).
- निधीचे वितरण: कापूस उत्पादकांना १,५४८.३४ कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादकांना २,६४६.३४ कोटी रुपये.
- अर्थसंकल्पातील घोषणा: सोयाबीन आणि कापसाच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून अर्थमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली होती.
शेतकरी या सोप्या स्टेप्स फॉलो करून आपल्या मोबाईलवर अनुदानाचे अपडेट सहज तपासू शकतात.
1 thought on “Kapus Soybean Anudan : कापूस सोयाबीन अनुदानाचे 5 हजार मिळाले कि नाही? असे तपासा तुमच्या मोबाईल वरून”