Gold Price News : सोन्याच्या किमतीत घसरण सुरुच सणासुदीत , आता जोरदार करा खरेदी, दमदार वाढीनंतर स्वस्त झाले सोने-चांदी

Gold Price News : या आठवड्यात सोने आणि चांदीने दमदार बॅटिंग केली. सणासुदीत मौल्यवान धातूच्या किंमतीत वाढ झाल्याने ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. पण आता या धातू्च्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. काल दुपारच्या सत्रातच ग्राहकांना दिलासा मिळाला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

देशभरात सणासुदीची धामधूम सुरू झाली आहे. राज्यात तर गणेशोत्सव, महालक्ष्मी यांच्या भक्तीत भाविक तल्लीन झाले आहेत. या काळात खरेदी करण्याच्या उत्साहावर मात्र दरवाढीने पाणी फेरले गेले. मौल्यवान धातूच्या खरेदीला ब्रेक लागला. देवांसाठी दागिने खरेदीसाठी ग्राहकांना अधिक रक्कम मोजावी लागली. पण काल दुपारनंतर दोन्ही धातूंनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला. तीन दिवसांच्या दमदार बॅटिंगनंतर या धातूत घसरण दिसून आली. आता काय आहेत सोने आणि चांदीची किंमत?

 

सोन्यात आली स्वस्ताई

ऐन सणासुदीत सोने चमकले. सोन्यात दरवाढ झाली. 10 सप्टेंबर रोजी सोने 440 रुपयांनी उतरले. 11 सप्टेंबर रोजी सोने 380 रुपयांनी वधारले. तर 12 सप्टेंबर रोजी त्यात किंचित घसरण झाली. आज सकाळच्या सत्रात सुद्धा भाव उतरल्याचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

 

चांदीच्या घौडदौडीला लागला ब्रेक

या आठवड्यात चांदीने दमदार कामगिरी बजावली. 9 सप्टेंबरला चांदी 500 रुपयांनी वाढली. 10 सप्टेंबरला 1 हजारांनी चांदी महागली. 11 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी किंमत वधारली. तर 12 सप्टेंबर रोजी भाव स्थिर होता. आज सकाळच्या सत्रात त्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,500 रुपये आहे.

 

22 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 71,801, 23 कॅरेट 71514, 22 कॅरेट सोने 65,770 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,851 रुपये, 14 कॅरेट सोने 42,004 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 83,188 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

 

 

Today 22 Carat Gold Price Per Gram in Mumbai (INR)

Gram  Today  Yesterday  Change

1     ₹ 7,121      ₹ 7,120    + ₹ 1

8     ₹ 56,968    ₹ 56,960  + ₹ 8

10   ₹ 71,210    ₹ 71,200  + ₹ 10

100 ₹ 7,12,100 ₹ 7,12,000 + ₹ 100

 

Today 24 Carat Gold Price Per Gram in Mumbai (INR)

Gram  Today  Yesterday  Change

1.    ₹ 7,768      ₹ 7,767   + ₹ 1

8      ₹ 62,144   ₹ 62,136  + ₹ 8

10     ₹ 77,680  ₹ 77,670  + ₹ 10

100 ₹ 7,76,800 ₹ 7,76,700 + ₹ 100

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल

 

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment