E Peek Pahani: 712 उताऱ्यावर पिकांची नोंद कशी करावी?

E Peek Pahani: 2024 च्या खरिप हंगामासाठी ही प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू झाली असून 15 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकरी स्वतःहून ही नोंदणी करू शकतात. यानंतर तलाठी स्तरावर ही प्रक्रिया सुरू होईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E Peek Pahani: ई-पीक पाहणी कशी करायची?

  • ई-पीक पाहणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला E Peek Pahani (DCS) हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करावे लागेल. इस्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर, अॅप ओपन करा आणि आवश्यक ती परवानगी द्या. आता, तुमच्या गावाच्या संबंधित महसूल विभागाची निवड करा आणि शेतकरी म्हणून लॉग-इन करा.
  • लॉग-इन केल्यावर, तुमचा मोबाईल नंबर, विभाग, जिल्हा, तालुका, आणि गावाची माहिती प्रविष्ट करा. तुमच्या शेताचे खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून, संबंधित खातेदार निवडा. खातेदाराचे नाव आणि खाते क्रमांक तपासून पुढे जा. E Peek Pahani app डाउनलोड करा
  • त्यानंतर तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल, जो तुम्ही प्रविष्ट करून पुढे जाऊ शकता. पुढे, पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करा. खाते क्रमांक, गट क्रमांक आणि लागवडीखालील क्षेत्र निवडून, हंगाम, पिकाचा प्रकार, क्षेत्र यांची माहिती भरा.
  • यानंतर, पिकांचे दोन फोटो घेणे अनिवार्य आहे. यासाठी अॅपमध्ये दिलेल्या पर्यायांचा वापर करा. माहिती साठवली आणि अपलोड झाली की तुम्ही नोंदवलेली माहिती पिकांची माहिती पाहा या पर्यायावर क्लिक करून तपासू शकता.

ई-पीक पाहणीचे फायदे

ई-पीक पाहणीद्वारे नोंदवलेल्या माहितीचा उपयोग शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजना आणि लाभांसाठी होतो:

  • किमान आधारभूत किंमत (MSP): पीक विक्रीसाठी MSP मिळवण्यासाठी ही माहिती वापरली जाते.
  • पीक कर्ज पडताळणी: शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाच्या पडताळणीसाठी बँका या माहितीचा वापर करतात.
  • पीक विमा: पीक विमा योजनेच्या लाभांसाठी देखील ई-पीक पाहणीतील माहितीचा वापर केला जातो.
  • नुकसान भरपाई: नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानासाठी भरपाई मिळवण्यासाठी या माहितीचा उपयोग होतो.

ई-पीक पाहणीची अट कशासाठी रद्द?

राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, यासाठी ई-पीक पाहणीची अट असताना मोठ्या प्रमाणात विरोध झाला. परिणामी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही अट रद्द केली असून, सातबाऱ्यावरील नोंदी ग्राह्य धरल्या जातील.

महत्त्वाचे: खरिप पिकांसाठी मात्र शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करावीच लागणार आहे.

Kapus Soybean Farmers Beneficiary Status: कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्थसहाय्य मिळाल्याची स्थिती कशी तपासावी

1 thought on “E Peek Pahani: 712 उताऱ्यावर पिकांची नोंद कशी करावी?”

Leave a Comment