Crop Damage Subsidy: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शेतीपिकांच्या नुकसान भरपाईसाठी 596 कोटींचा निधी मंजूर

Crop Damage Subsidy: राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने शेतीपिकांच्या नुकसानीसाठी ५९६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात मदत देण्यात येणार आहे. यासाठी शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्याचे निकष व दर निश्चित केले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोव्हेंबर २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे. यापूर्वीही शासनाने विविध कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत मंजूर केली होती.

Crop Damage Subsidy Maharashtra

जानेवारी २०२४ ते मे २०२४ या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत. त्यानुसार ५९६.२१९५ कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे. हा निधी DBT पोर्टव्दारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट वितरित करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा: Soyabin Cotton Subsidy: “या” शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 5,000 रुपये अनुदान? तुम्ही पात्र आहात का?

तसेच, शासन निर्णयानुसार जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीचे विहित दर आणि ३ हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाणार आहे. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल. या निधीचा वापर केवळ शेतीपिकांच्या नुकसानीसाठीच होणार असल्याची खात्री संबंधित अधिकारी करतील.

शेतकऱ्यांना मदतीचा हा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये, याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याची सूचना आहे. संबंधित कार्यालयांनी या निधीच्या खर्चाचे लेखे ठेवून शासनास प्रमाणपत्रे सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्तांची राहील.

Crop Damage Subsidy gr : महसूल व वन विभागाने जारी केलेला शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment