BSNL Recharge Plan : देशातील दूरसंचार क्षेत्रात मोठी स्पर्धा असतानाही BSNL ने ग्राहकांसाठी आणखी एक धमाकेदार ऑफर सादर केली आहे. कंपनीने फक्त 91 रुपयांमध्ये 90 दिवसांची वैधता असलेला रिचार्ज प्लान लॉंच केला आहे, ज्यामुळे ग्राहकांना मोठाच दिलासा मिळणार आहे. BSNL Recharge Plan
जुलै महिन्याच्या सुरुवातीला जिओ, एअरटेल, आणि वोडाफोन आयडिया या कंपन्यांनी आपल्या प्लॅनच्या दरांमध्ये वाढ केली असताना BSNL ने मात्र आपल्या जुन्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. एअरटेल आणि वोडाफोन सारख्या खाजगी नेटवर्क कंपन्यांनी रिचार्जच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे ग्राहक वर्ग नाराज झाला होता. यामुळे अनेक ग्राहक BSNL कडे वळू लागले आहेत. कंपनीने 100 रुपयांपेक्षा कमी दरात विविध रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत.
BSNL Recharge Plan
या नवीन 91 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 90 दिवसांची वैधता, कॉलिंग चार्ज प्रति मिनिट 15 पैसे, डेटा चार्ज प्रति मेगाबाईट 1 पैसा, आणि एसएमएस चार्ज 25 पैसे असे बेसिक फायदे मिळणार आहेत. कॉलिंग आणि डेटा वापर अधिक करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त टॉप-अप घेणे आवश्यक असेल. दरम्यान, BSNL ने 107 रुपयांचा आणखी एक प्लॅन सादर केला आहे, ज्यामध्ये 35 दिवसांची वैधता, सर्व नेटवर्कवर 200 मिनिटे कॉलिंग, आणि 3 जीबी डेटाचा लाभ मिळणार आहे. मात्र, मर्यादित डेटामुळे हा प्लॅन जास्त डेटा वापरणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार नाही.
BSNL च्या या दोन्ही प्लॅनमुळे ग्राहकांच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. या प्लॅनमुळे कंपनीलाही ग्राहकांच्या संख्येत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
रिचार्ज दरांमध्ये वाढ झाल्यामुळे ग्राहक वर्ग आधीच स्वस्त आणि किफायतशीर रिचार्ज प्लॅन आणि उत्तम नेटवर्क सुविधा असलेल्या नेटवर्ककडे वळत आहेत. अशात BSNL कडून दिल्या जाणाऱ्या कमी दरांमुळे ग्राहक नक्कीच BSNL कडे आकर्षित होतील.
Bsnl. मुंबई त अंधेरी वर्सोवा येथे मिळत नाही डॉल्फिन चालत नाही फक्त वाय फाय वर काम चालत मी गेली कित्येक वर्षे bsnl वापरतो पण मुंबई त त्याला पर्याय नाही दिल्लीत आणि इतर राज्यात net वर्क चांगले मिळते मग मुंबई त का मिळत नाही ते कधी मिळणार
BSNL 4G card Order