Maha Yojana Doot: मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी अर्ज करा, पात्रता, कागदपत्रे व अधिक माहिती जाणून घ्या

Maha Yojana Doot: महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी www.mahayojanadoot.org या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उपक्रमाचा उद्देश

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे. ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी आणि शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक योजनादूत नेमला जाणार आहे. एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी नियुक्ती केली जाणार आहे, ज्यांना दरमहा १०,००० रुपये मानधन दिले जाईल.

Maha Yojana Doot: पात्रता निकष

  • उमेदवाराचा वयोगट: १८ ते ३५ वर्षे
  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक
  • अधिवास प्रमाणपत्र: महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक
  • संगणक ज्ञान: उमेदवारास संगणकाचे प्राथमिक ज्ञान असावे
  • स्मार्टफोन आणि आधार संलग्न बँक खाते आवश्यक

Maha Yojana Doot: अर्ज प्रक्रिया

ऑनलाईन अर्ज करताना खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:

  1. आधार कार्ड
  2. पदवी प्रमाणपत्र
  3. अधिवास प्रमाणपत्र
  4. आधार जोडलेले बँक खाते
  5. पासपोर्ट आकाराचा फोटो
  6. हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यातून)

अर्ज करण्याची अंतिम तारीख

इच्छुक उमेदवारांना १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज भरता येईल. अर्ज भरण्यासाठी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

हे वाचायला विसरू नका :

Ladki Bahin Yojana Scam: लाडकी बहीण योजनेत फसवणूक: राज्य सरकारचा कठोर निर्णय, बोगस अर्जदारांवर गुन्हे दाखल होणार

2 thoughts on “Maha Yojana Doot: मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी अर्ज करा, पात्रता, कागदपत्रे व अधिक माहिती जाणून घ्या”

Leave a Comment