Soyabin Cotton Subsidy : सन २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने नवीन आर्थिक सहाय्याची घोषणा केली आहे. दिनांक २९ जुलै, २०२४ रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार कोणते शेतकरी पात्र आहेत, ते जाणून घेऊया. Soyabin Cotton Subsidy
उपमुख्यमंत्र्यांची घोषणा
मा. उप मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी दि.०५ जुलै, २०२४ रोजी सन २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांबाबत महत्त्वाचे विधान केले. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे कापूस व सोयाबीनच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली. यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. त्यासाठी खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Soyabin Cotton Subsidy: शासन निर्णयाचे विवरण
या घोषणेच्या आधारे शासनाने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान जाहीर केले आहे. या निर्णयानुसार,
- राज्यातील २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रती हेक्टरी रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य मंजूर करण्यात येत आहे.
- कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रु.१५४८.३४ कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रु.२६४६.३४ कोटी असा एकूण रु.४१९४.६८ कोटी खर्चाची मान्यता देण्यात आली आहे.
- सदरचा खर्च कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्ष २४०१४१९ खाली करण्यास मान्यता दिली आहे.
पात्रतेचे निकष soyabin cotton subsidy in maharashtra
(१) २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रती हेक्टरी रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य अनुज्ञेय राहील.
(२) ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी अँप/पोर्टलवर कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे, तेच शेतकरी अर्थसहाय्यासाठी पात्र राहतील.
(३) ई-पीक पाहणी अँप/पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसारच अर्थसहाय्य मिळेल.
(४) अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) माध्यमातूनच जमा केले जातील.
(५) ही योजना फक्त २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादीत राहील.
निष्कर्ष
वरीलप्रमाणे, या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. त्याचबरोबर, शेतकऱ्यांनी याची नोंदणी प्रक्रिया आणि पात्रतेची पूर्तता करून लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा.
1 thought on “Soyabin Cotton Subsidy: फक्त याच शेतकर्यांना मिळणार कापूस, सोयाबीनचे हेक्टरी 5,000 रुपये अनुदान, पहा तुम्ही पात्र आहात का नाही?”