Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वपूर्ण अपडेट, आतापर्यंत किती महिलांनी अर्ज केले ? या जिल्ह्यातून आले फक्त 25 अर्ज 

Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत महिलांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत. ताज्या माहितीनुसार, या योजनेची अंदाजित लाभार्थी संख्या 2 कोटी 45 लाखांवर पोहोचली आहे. यामध्ये ३० ते ४० वयोगटातील महिलांनी सर्वाधिक म्हणजे ९ लाख ८२ हजार ११९ अर्ज सादर केले आहेत. तर २१ ते ३० वयोगटातील मुलींनी ७ लाख ११ हजार १११ अर्ज सादर केले आहेत. एकूण अर्जदारांपैकी २५ लाख ८६ हजार ८०५ अर्जदार विवाहित महिला आहे. तर अविवाहित महिला- २ लाख ४९ हजार ७१३ अर्ज, विधवा – १ लाख १५ हजार ५४५ अर्ज, घटस्फोटीत ११ हजार ५ अर्जदार आहेत. Ladki Bahin Yojana List

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana पुण्यातून सर्वाधिक अर्ज

लाडकी बहीण योजनेला सर्वाधिक प्रतिसाद पुणे जिल्ह्यातून मिळाला आहे. पुण्यातील 2 लाख 75 हजार महिलांनी अर्ज भरले आहेत. कोल्हापुरातून 2 लाखांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत, तर सोलापूर जिल्ह्यातून 1 लाख 66 हजार अर्ज आले आहेत. अहमदनगरमधून 1 लाख 60 हजारांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. वाशिम जिल्ह्यातून मात्र केवळ 25 अर्ज आले आहेत.

लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी नारी शक्ती दूत Narishakti Doot app डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

राज्य सरकारकडून आता लवकरच पात्र ठरलेल्या महिलांची यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीतील महिलांना राज्य सरकारकडून महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

लाडकी बहीण योजनेत पाच महत्त्वाचे बदल (CM Ladki Bahin Yojana New Rule)

  1. नवविवाहित महिलेचे रेशन कार्ड अद्याप तयार नसेल, तर तिच्या पतीचे रेशनकार्ड अत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाईल.
  2. परराज्यात जन्म झालेल्या, पण सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह केला असल्यास पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.
  3. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पोस्टातील बँक खातेदेखील ग्राह्य धरले जाणार आहे.
  4. ऑफलाईन अर्जातील महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी वापरता येईल.
  5. बालवाडी सेविका, अंगवणवाडी सेविका, आशा सेविका, सेतु सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांना महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.

योजनेसाठी पात्र वयोगट

राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात.

आणखी वाचा: Mukhyamantri Teerth Darshan Yojana: ज्येष्ठ नागरिकांना सरकारची ‘विशेष भेट’; मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर, काय आहेत पात्रता? फायदा कोणाला होणार? योजनेविषयी A ते Z माहिती एका क्लिकवर

1 thought on “Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वपूर्ण अपडेट, आतापर्यंत किती महिलांनी अर्ज केले ? या जिल्ह्यातून आले फक्त 25 अर्ज ”

Leave a Comment